Sanatan Prabhat कधीतरीच हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक ! जम

http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2008-08-26&action=fullnews&catid=3&id=11428

कधीतरीच हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक !

Source Sanathan

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याऐवजी सरकारने जम्मूमधील हिंदूंचा संताप जाणून घेण्याचा प्रयत्‍न केल्यास योग्य होईल ! अमरनाथ मुद्यावर आत्मचिंतन करण्याची संधी सरकारने घालवू नये; कारण कधीतरी हिंदूंच्या संतापाच्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो. हिंदूंच्या संतापामागे अमरनाथ जमिनीचा एकच मुद्दा आहे का ? त्यांच्यामध्ये संताप निर्माण करण्यासाठी इतर मुद्दे नाहीत का ? या गोष्टींचा उहापोह होणे आवश्यक आहे.
- फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिएशतकभरात काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांत हिंदू अल्पसंख्य !
हिंदू शांतीप्रिय नागरिक आहेत; मात्र जगात प्रत्येक ठिकाणी हिंदूंची अवहेलना केली जाते. फिजी, पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे भारताच्या विरोधात संताप व्यक्‍त करतांना हिंदूंना लक्ष्य ठरवले जाते. १९०० सालात काश्मीर खोर्‍यात १० लाख हिंदू होते, तर आता तेथे काही शेकडोच हिंदू शिल्लक आहेत. दहशतवाद्यांमुळे काश्मीर सोडून पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. आसाम, त्रिपुरा किंवा नागालँड येथे तेथील हिंदूंपेक्षा बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची संख्या जास्त आहे. तसेच या राज्यांत िख्र्तासीवाद्यांचा दहशतवादही मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

सर्वसमावेशक हिंदूंना लक्ष्य का केले जाते ?
गेल्या ३ हजार ५०० वर्षांचा इतिहास पहाता, हिंदूंनी कधीच इतर देशावर आक्रमण केलेले नाही. तसेच त्यांनी त्यांचा धर्म इतरांवर कधीच लादला नाही. सांप्रत काळात हिंदु धर्माची उपांगे असलेल्या योग, ध्यान, आयुर्वेद, प्राणायम यांचा अंगीकार जगभरातील लाखो नागरिक करत आहेत. जगातील बहिष्कृत अल्पसंख्यांकांना हिंदूंनी नेहमीच आश्रय दिलेला आहे. अशा हिंदूंना िख्र्तासींनी धर्मांतराच्या माध्यमातून, तर मुसलमानांनी रक्‍तरंजित आक्रमणांनी नेहमी विरोधच केला.

अमरनाथमधील उद्रेक कशासाठी ?
गुजरात दंगलीची आपण निंदाच केली पाहिजे; मात्र त्यामागची कारणे जाणून घेणे तेवढेच आवश्यक आहे. गुन्हेगाराच्या एका गटाने ५९ निष्पाप हिंदूंना रेल्वेमध्ये जाळून टाकले होते. त्यामुळे हिंदूंचा संताप अनावर झाला. एवढ्यावरच हा संताप सीमित नाही, तर वर्षांनुवर्षे गुजरातच्या हिंदूंवर झालेल्या अन्यायांचाही संताप होतो, हे आपण जाणले पाहिजे. अमरनाथ मुद्याच्या बाबतीतही तसेच आहे. मुसलमानांना हज यात्रेसाठी कोट्यवधी रुपये सरकारकडून दिले जातात, त्याबद्दल हिंदूंनी कधी तक्रार केलेली नाही; मात्र जेव्हा हिंदूंना यात्रेसाठी सुविधा हव्या आहेत, तेव्हा त्या सरकारकडून नाकारल्या जातात; म्हणूनच हा उद्रेक आहे ! या सरकारने किंवा पुढे येणार्‍या सरकारने हिंदूंच्या या संतापाची दखल घेतली नाही, तर आणखी अनेक `जम्मू' ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक झालेले आपल्याला दिसतील !

Comments

Popular posts from this blog

The great Hindu revolution of Narendra Modi

Analyzing Worldwide Media Anti-Hindu Bias – An Interview with Francois Gautier

What is Indian-ness and & why it is absolutely needed for India to innovate again